
सामना ऑनलाईन। डब्लीन
सुनील ऍम्ब्रीसच्या पहिल्यावहिल्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजने येथे सुरू असलेल्या तिरंगी वन डे मालिकेत यजमान आयर्लंडवर पाच गडी व 13 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आणि फायनलमध्ये धडक मारली. 148 धावा तडकावणारा सुनील ऍम्ब्रीस प्लेयर ऑफ दी मॅच ठरला. नऊ गुणांसह तालिकेत विंडीजचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. येत्या शुक्रवारी अंतिम फेरीची लढत रंगेल. बांगलादेश व आयर्लंड यांच्यापैकी एक संघ विंडीजला आव्हान देईल. आयर्लंडकडून मिळालेल्या 328 धावांचा पाठलाग करणाऱया वेस्ट इंडीजने पाच गडी राखून विजयी लक्ष्य ओलांडले. सुनील ऍम्ब्रीसने 126 चेंडूंत एक षटकार व 19 चौकारांसह 148 धावांची जबरदस्त खेळी साकारली.
ऍण्डीच्या शानदार 135 धावा
आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर पॉल स्टार्ंलगने 77 धावांची शानदार खेळी साकारत आयर्लंडसाठी मोलाची कामगिरी बजावली. पण ऍण्डी बालबर्नीने 124 चेंडूंत 135 धावांची अफलातून खेळी साकारताना विंडीजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. या खेळीत त्याने चार षटकार व अकरा चौकार लगावले. केव्हीन ओब्रायनने 63 धावा फटकावल्या.




























































