पश्चिमरंग – दि प्लॅनेट्स

>> दुष्यंत पाटील

इंग्रज संगीतकार होल्स्ट याने प्रत्येक ग्रहाचे हे विशिष्ट व्यक्तिमत्त्व संगीतात उतरवण्याचा प्रयत्न केला. ‘दि प्लॅनेट्स’ नावाच्या या संगीत रचना विसाव्या शतकात प्रचंड गाजल्या. रॉक बँडपासून ते जॅझ ऑर्केस्ट्रांपर्यंत कित्येक मंडळींनी ‘दि प्लॅनेट्स’पासून प्रेरणा घेत संगीत निर्माण केले.

इंग्रज संगीतकार होल्स्ट याचे संघर्षाचे दिवस चालू होते. वर्ष होतं 1912. अजूनही तो कुणाला फारसा माहीत नव्हता, पण या वर्षी गार्डनर नावाच्या संगीतकाराने महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्याची एक संगीत रचना विख्यात अशा क्वीन्स हॉलसारख्या ठिकाणी सादर करण्यात आली. हा-sल्स्टन पूर्वी अल्जीरिया देशात सुट्टीसाठी गेलेला असताना तिथे ऐकलेले संगीत वापरून त्याने ही रचना केली होती. या रचनेसाठी त्याला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला.
पुढच्याच वर्षी त्याला पुन्हा एकदा गार्डनरच्या मदतीने आपली रचना क्वीन्स हॉलमध्ये सादर करण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने आपली ‘क्लाऊड मेसेंजर’ नावाची रचना सादर करण्याचे ठरवले. त्याच्या मते ‘क्लाऊड मेसेंजर’ ही त्याची आजपर्यंतची सर्वोत्कृष्ट रचना होती. या रचनेवर त्यानं बरीच वर्षे काम केले होते. ‘क्लाऊड मेसेंजर’ ही संगीत रचना हिंदुस्थानी संस्कृत कवी कालिदास याच्या ‘मेघदूत’ नावाच्या काव्यावर आधारित होती. त्याला ‘क्लाऊड मेसेंजर’कडून खूप अपेक्षा होत्या, पण दुर्दैवाने ही संगीत रचना अपयशी ठरली. ‘क्लाऊड मेसेंजर’च्या अपयशाने होल्स्ट प्रचंड निराश झाला. त्याला नैराश्य आले असले तरी गार्डनरने दिलेल्या संधीबद्दल तो गार्डनरविषयी कृतज्ञ होता.
होल्स्ट नैराश्यात बुडालेला असतानाच गार्डनरने त्याला सुट्टीसाठी आपल्या सोबत स्पेनला येण्याचे आमंत्रण दिले. होल्स्टसाठी हा ब्रेक महत्त्वाचा होता. गार्डनर स्वतही एक संगीतकार होता आणि त्यांच्या सोबत स्पेनमध्ये अजूनही एक संगीतकार येणार होता. हे लोक सुट्टीसाठी निघाले. स्पेनला लागून असणाऱया एका बेटावर जाताना प्रवासात त्यांच्यात एकमेकांच्या संगीत रचनांवर दिलखुलास गप्पा झाल्या.
होल्स्टने सुट्टीचा आनंद मनमुरादपणे लुटला. तिथला स्वच्छ सूर्यप्रकाश, सूर्यप्रकाशात अगदी निवांतपणे फिरणारी माणसे आणि सतत चालू असणारी वाऱयाची झुळूक हे सारेच त्याला आवडले होते. तिथल्या रात्रीही मनमोहक होत्या. कारण तिथे रात्रीचे चांदणे इंग्लंडच्या तुलनेत अधिक सुस्पष्ट दिसायचं. या सुट्टीत तो नैराश्यातून पूर्णपणे बाहेर आला. या सुट्टीत अजून एक गोष्ट घडली. गार्डनरला ज्योतिष या प्रकारात रस होता. कुठला ग्रह माणसाच्या आयुष्यावर काय प्रकारचा प्रभाव टाकतो यावर तो बोलायचा. होल्स्टला एका प्रकारे या विषयात रस यायला लागला. सारे ग्रह मानवी जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकतात ही कल्पना त्याला खुणावत होती. प्रत्येक ग्रहाविषयी त्याच्या डोक्यात काही विशिष्ट कल्पना होत्या. या त्याला संगीत रचनेसाठी साद घालत होत्या.
सुट्टीमधून परत आल्यानंतर होल्स्टमध्ये एक नवीन उत्साह संचारलेला होता. होल्स्ट एका शाळेत शिकवायचे काम करायचा. खरे तर शाळेतल्या वातावरणात संगीतरचना करण्यासाठी त्याला अवघड जात होते, पण आता या शाळेत संगीताचा नवीन स्वतंत्र विभाग सुरू झाला होता. होल्स्टला आता एक नवीन साऊंडप्रूफ असणारी स्वतंत्र मोठी खोली मिळणार होती. या खोलीत दोन पियानोंसोबत संगीत रचना लिहिण्यासाठी टेबल आणि खुर्चीही होती. कडाक्याच्या थंडीत खोलीतले तापमान वाढवण्यासाठी इथे हीटिंग सिस्टीमही होती. एकूणच, होल्स्टला ही खोली स्वप्नवत वाटत होती.
रविवारच्या दिवशी शाळेत कुणीही नसताना या खोलीत जाऊन संगीत रचना करायला होल्स्टला आवडायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर तो पूर्णकाळ या खोलीतच दिसायचा. ग्रहांविषयी संगीत रचण्याचे बरेचसे काम त्याने या खोलीतच केले. याच काळात त्याने लंडन शहराच्या वर्दळीपासून दूर ग्रामीण भागात एका टेकडीवर घर घेतले. मुख्य वस्तीपासून हे बरेच दूर होते. बऱयाचदा जोडून आलेल्या सुट्टय़ांच्या काळात त्याने या घरामध्ये संगीत रचनांचे काम केले.
होल्स्टच्या समजुतीप्रमाणे वेगवेगळे ग्रह आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींचे कारक होते. उदा. मंगळ हा ग्रह त्याच्या कल्पनेप्रमाणे युद्धाचा कारक होता, तर पा ग्रह शांतीचा कारक होता. प्रत्येक ग्रहाचं हे विशिष्ट व्यक्तिमत्त्व त्याने आपल्या संगीतात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या संगीत रचनासंग्रहाला ‘दि प्लॅनेट्स’ असे नाव दिले. हे संगीत त्याने संपूर्ण ऑर्केस्ट्रासाठी रचले होते.
त्याची पहिलीच रचना मंगळ ग्रहाविषयी होती. त्याच्या समजुतीप्रमाणे हा ग्रह युद्धाचा कारक होता. हिंसा, भय अशा गोष्टी दर्शविणारं संगीत त्याने मंगळ ग्रहाच्या रचनेत केले. त्याच्या कल्पनेप्रमाणे पा हा ग्रह शांतीचा कारक होता. त्यामुळे पा ग्रहाची रचना अतिशय संथ गतीने येत होती. गुरू ग्रहामुळे जीवनात आनंद, शक्ती येत होती असे त्याला वाटायचे. हेच भाव असणारे संगीत त्याने गुरू ग्रहासाठी रचले. शनी हा ग्रह वृद्धत्वाचा कारक होता असे त्याला वाटायचे. मंदगतीने सुरू होणारे शनीच्या रचनेतले संगीत शेवटी आवाज हळूहळू होत थांबत होते. युरेनस हा ग्रह जादू घडवून आणायचा तर नेपच्यून हा ग्रह गूढ होता. एखाद्या बेताल नृत्याच्या संगीताची आठवण करून देणारे युरेनसचे संगीत होते. नेपच्यूनचे संगीत गूढ आणि शांत होते.
सुरुवातीला समीक्षकांच्या संमिश्र प्रतिाक्रिया मिळालेले ‘दि प्लॅनेट्स’चे संगीत विसाव्या शतकात प्रचंड गाजले. आजपर्यंत ‘दि प्लॅनेट्स’ची कमीत कमी 80 रेकॉर्डिंग्ज झालेली आहेत. रॉक बँडपासून ते जॅझ ऑर्केस्ट्रांपर्यंत कित्येक मंडळींनी ‘दि प्लॅनेट्स’पासून प्रेरणा घेत संगीत बनवले. कित्येक चित्रपटांमध्ये ‘दि प्लॅनेट्स’मधलं संगीत वापरले गेले. गुरू ग्रहाच्या संगीतावर आधारित एक राष्ट्रभक्तिपर गीत रचले गेले. ते इतके लोकप्रिय झाले की, विस्टन चर्चिलच्या अंत्ययात्रेपासून ते राजकन्या डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या विवाह सोहळ्यापर्यंत अनेक ठिकाणी वापरले गेले. ‘स्टार वॉर्स’ मालिकेतल्या युद्धांमध्ये मंगळ ग्रहाचे संगीत वापरले गेले. ‘दि प्लॅनेट्स’चे संगीत विसाव्या शतकात इतके लोकप्रिय का व्हावे, इतक्या ठिकाणी हे संगीत का वापरले जावे हे पाहण्यासाठी आपण ‘प्दत्st ऊप झ्त्aहे’ मधली ‘श्ars, tप ँrग्ही द sंar’ किंवा ‘व्ल्ज्ग्tाr, tप ँrग्ही द व्दत्त्ग्tब्’ यासारखी रचना एकदा तरी यूटय़ूबवर ऐकायलाच हवी!

 [email protected]