
>> दुष्यंत पाटील
साहित्य, कला, संगीत यासारख्या विषयामध्ये रस असणाऱया लोकांना नियमितपणे भेटून बौद्धिक चर्चा करणं, कवितेचं वाचन करणं, संगीत सादर करणं हा प्रकार इ.स. 1500 ते इ.स. 1900 अशी चारशे वर्षं सगळय़ा युरोपभर चालायचा. लोकांनी अशाप्रकारे एकत्र भेटण्याला ‘सलॉन’ असं म्हणत. एकोणिसाव्या शतकात सलॉनमध्ये एका विशिष्ट प्रकारचं संगीत सादर व्हायला सुरुवात झाली. जे सलॉन संगीत या नावानंच ओळखलं जायचं.
एखाद्या इंटरेस्टिंग विषयावर त्या विषयात रस असणाऱया व्यक्ती मोकळेपणानं चर्चा करणार असतील तर ती चर्चा ऐकायला कुणाला आवडणार नाही? कल्पना करा की कुणीतरी रसिक आणि धनाढय़ व्यक्ती आपल्या घरी नियमितपणे (कदाचित दर पंधरवडय़ानं एकदा) साहित्य, कला, संगीत यासारख्या एखाद्या विषयामध्ये रस असणाऱया लोकांना खास आपले विचार आदानप्रदान करण्यासाठी बोलवत आहे, अशा ठिकाणी जाणं म्हणजे एक प्रकारची बौद्धिक मेजवानीच असेल. त्यातही पूर्वीच्या काळात, जेव्हा टीव्ही, रेडिओ, फोन, इंटरनेट वगैरे काहीच नव्हतं अशा काळात लोकांनी नियमितपणे भेटून बौद्धिक चर्चा करणं, कवितेचं वाचन करणं, संगीत सादर करणं म्हणजे नक्कीच एकप्रकारे समृद्ध करणारा अनुभव असणार.
हा प्रकार इ.स. 1500 ते इ.स. 1900 अशी चारशे वर्षं सगळय़ा युरोपभर चालायचा. लोकांनी अशाप्रकारे एकत्र भेटण्याच्या कार्पामाला ‘सलॉन’ असं म्हणत. काही वेळेला यामध्ये काव्यासारख्या एखाद्या विशिष्ट विषयावर नियमितपणे चर्चा व्हायच्या, तर काही वेळेला चर्चेसाठी कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या विषयाचं बंधन नसायचं. या कार्पामांमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर लोकांनी एखाद्या विषयावर वैचारिक मंथन करणं, सर्वांनी त्या विषयावरची चर्चा लक्षपूर्वक ऐकणं आणि चर्चेतून स्वतचं ज्ञान वाढवणं.
या सलॉन संस्कृतीची सुरुवात युरोपमध्ये पंधराव्या शतकात झालेली दिसते. या काळातले विचारवंत, कवी, संगीतकार, कलाकार मंडळी सलॉनच्या निमित्तानं नियमितपणे भेटत असल्याच्या लिखित स्वरूपातल्या नोंदी सापडतात. बाहेर आपले विचार जाहीरपणे मांडायचे असतील तर आपल्या विचारांवर चर्च काय भूमिका घेईल हा विचार करायला लागायचा. पण ‘सलॉन’मध्ये विचार व्यक्त करताना कसलीही भीती नसायची. इथे कुणीही मुक्तपणे आपल्या मनातले विचार बोलू शकायचा. या कार्पामात समाजातल्या वेगवेगळय़ा स्तरातले लोक येताना दिसायचे.
बहुतेक वेळा उच्च घराण्यातल्या स्त्रिया ‘सलॉन’ कार्पामाचं आयोजन करायच्या. ‘सलॉन’च्या कार्पामात जाताना वेशभूषा कशी करायची, तिथे बोलायचं कसं, तिथे वागायचं कसं अशा विषयावर प्रबोधनकाळात पुस्तकंही लिहिली गेली! इटलीमध्ये सलॉनची संस्कृती वाढल्यानंतर ती हळूहळू फ्रान्समध्येही पसरायला लागली. मग सलॉन संस्कृती सगळय़ा युरोपभर पसरली. पण ही संस्कृती जितकी फ्रान्समध्ये लोकप्रिय झाली तितकी ती इतर कुठल्याही देशात झाली नाही. साहित्य, काव्य, कला, राजकारण, विज्ञान, संगीत अशा कितीतरी विषयांवर फ्रान्समधल्या सलॉन कार्पामांमध्ये मुक्तपणे चर्चा होताना दिसायच्या.
फ्रान्समध्येही उच्च घराण्यातल्या स्त्रियाच सलॉन कार्पामांचं आयोजन करताना दिसायच्या. त्या काळात स्त्रियांना अधिकृतरीत्या शिकण्याची संधी मिळायची नाही. त्यामुळे आजूबाजूच्या जगात वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये नेमकं काय चालू आहे हे त्यांना सलॉनमध्ये समजायचं. एखाद्या व्यक्तीनं सलॉनमध्ये नीट वर्तन केलं नाही तर त्याला पुढच्या सलॉनचं आमंत्रणच मिळायचं नाही. कुणीही आमंत्रणाशिवाय सलॉन कार्पामात येऊ शकायचं नाही.
एकोणिसाव्या शतकात सलॉनमध्ये एका विशिष्ट प्रकारचं संगीत सादर व्हायला सुरुवात झाली. हे संगीत ‘सलॉन संगीत’ या नावानंच ओळखलं जायचं. बहुतेक वेळा हे संगीत पियानोसाठी रचलेलं असायचं. बऱयाचदा संगीत रचना करणारे संगीतकार सलॉनमध्ये स्वतच आपल्या रचना सादर करताना दिसायचे. वाजवायला कठीण असणाऱया या सलॉन रचना बहुतेक वेळा छोटय़ाच असायच्या. या रचनांमधलं संगीत खूप भावमय असायचं. सहसा दैनंदिन आयुष्यातल्या (किंवा काल्पनिक विश्वातल्या) वेगवेगळय़ा गोष्टींवर अशा रचना करण्यात यायच्या.
सलॉनमधलं संगीताचं सादरीकरण आणि बाहेर सर्व लोकांसमोर होणाऱया कार्पामांमधल्या संगीताचं सादरीकरण यात महत्त्वाचा फरक असायचा. बाहेरच्या कार्पामात खूप संख्येनं श्रोते असायचे. सलॉनमधला कार्पाम मर्यादित लोकांसाठीच असायचा. बाहेरच्या कार्पामात बऱयाचदा लांबलचक रचना सादर केल्या जायच्या. बाहेरच्या कार्पामात बऱयाचदा पूर्ण ऑर्केस्ट्रा असायचा. सलॉनमध्ये हे शक्य नसायचं. सोबत दिलेल्या चित्रावरून आपल्याला सलॉनमधल्या संगीताच्या सादरीकरणाची कल्पना येते.
सलॉन संगीत रचणारे बरेच संगीतकार होऊन गेले असले तरी त्यात शोपॅन या संगीतकाराचं नाव सर्वात वर येतं. शोपॅनला लहानपणापासूनच कमी लोकांच्या ग्रुपसमोर आपलं संगीत सादर करायला आवडायचं. त्याच्या संगीत रचना इतक्या काव्यमय असायच्या की पाश्चात्य संगीताच्या इतिहासात तो ‘पियानो कवी’ या नावानं ओळखला जातो. इतका मोठा संगीतकार असूनही त्यानं आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त 30 वेळाच सर्व लोकांसमोर जाहीर कार्पामात संगीत सादर केलं. तो नेहमी आपलं संगीत सलॉनमध्ये सादर करायचा.सलॉन संगीत नेमकं कसं होतं हे पाहण्यासाठी आपण Gustav lange वर जाऊन flower song ची ‘इत्दी एदहु’ ही रचना ऐकायला हवी!
[email protected]





























































