पुण्यात तरुणावर गोळी झाडून, कोयत्याने वार करून केला खून

प्रातिनिधिक फोटो

पुणे शहरातील खुनाचे सत्र थांबत नसून दत्तवाडीत मध्यरात्री एका तरुणावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोर पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

अमित मिलिंद सरोदे (वय २१ रा. जनता वसाहत) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आदर्श ननावरे, बोंबल्या आणि यशवंत कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अमित हा येथील शाहू वसाहतीसमोरील बालाजी होलसेलच्या जवळ थांबले असता अचानक आलेल्या तिघांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी ननावरे याने पिस्तूलमधून गोळी झाडली. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून केला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. याची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अमित हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अचानक झालेल्या या गोळीबाराने मोठा गोंधळ उडाला होता. पूर्ववैमनस्यातून खुन झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या खुनाच्या थराराने परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या