
मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी पालिकेने इलेक्ट्रिक व्हेइकल पॉलिसी तयार केली असून यापुढे बांधण्यात येणाऱया सर्व इमारतीत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय या वाहनांसाठी 20 टक्के पार्पिंग राखीव ठेवावे लागणार आहे. मुंबईत सध्या सहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन असून लवकरच 28 चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण खात्याचे उपायुक्त सुनील गोडसे यांनी दिली.
मुंबईला स्वच्छ-सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी पर्यटन-पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मुंबईतील गाडय़ांची संख्या पाहता 1500 चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण तयार करण्यात आले आहे. पालिकेसोबतच ‘बेस्ट’, महावितरणसह टाटा, अदानीसारख्या वीज क्षेत्रातील पंपन्यांसोबत या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी काम सुरू आहे.
‘फायर सेफ्टी’साठी स्वतंत्र समिती
इलेक्ट्रिक वाहनांमधील दुचाकी आणि चारचाकीमध्ये आग लागून दुर्घटना घडण्याचे प्रकार काही वेळा समोर येतात. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या ‘फायर सेफ्टी’साठी पालिका, अग्निशमन दल आणि ‘बेस्ट’च्या माध्यमातून निश्चित नियमावली तयार करण्यासाठी उपसमिती तयार करण्यात आली आहे.
असे राबवणार धोरण
मुंबईत यापुढे तयार होणाऱया इमारतीत चार्जिंग स्टेशन आणि या वाहनांसाठी 20 टक्के पार्पिंग उपलब्ध ठेवणे बंधनकारक राहील. बिल्डरला यानुसार इमारतीचे प्लॅनिंग करावे लागेल.
या धोरणाला चालना देण्यासाठी प्रोत्साहनपर योजनाही राबवण्यात येतील. आगामी काळात उभारण्यात येणारी चार्जिंग स्टेशन वॉर्ड ऑफिसजवळ, रुग्णालयांजवळ आणि पालिकेच्या मालमत्तांच्या ठिकाणी उभारण्यात येतील.
तर नवी चार्जिंग स्टेशन मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात उभारण्यात येतील. पुढील सहा महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण होईल. प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर दोन ते चार वाहनांसाठी चार्जिंग सुविधा.
पालिकेची चार्जिंग स्टेशन
n पालिका मुख्यालय, पर्ह्ट n चिंचपोकळी आर्थर रोड गॅरेजजवळ दोन n इंजिनीयरिंग हब वरळी गॅरेज n पंतनगर, घाटकोपर n सांताक्रुझ ट्रान्सपोर्ट गॅरेज
‘बेस्ट’मध्ये
तीन हजार इलेक्ट्रिक बस
‘बेस्ट‘मध्ये सध्या 386 बस इलेक्ट्रिक बसेस आहेत. तर आगामी काळात या उपक्रमात तीन हजार इलेक्ट्रिक बस आणल्या जातील. 2023 पर्यंत यातील 1900 बस आणल्या जाणार असून 2028 पर्यंत 100 टक्के इलेक्ट्रिक बस केल्या जाणार आहेत. तर आगामी काळात 55 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.


























































