भूकंपाच्या धक्क्याने जम्मू-कश्मीर, हिमाचल हादरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या सीमाभागाला सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपाची तीव्रता 5.0 रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

हिमाचलमधील चंबा गावाला 12 वाजून 10 मिनिटांनी भूकंपाचा हादरा बसला. त्यानंतर अर्ध्या तासात दोनवेळा भूकंपाचे हादरले जाणवले. रविवारीही याच भागाला भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता. सोमवारीही भूकंपाचा हादरा जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकं घराबाहेर येऊन रस्त्यावर उभे राहीले होते. रविवारी याच भागात 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा पहीला भूकंपाचा धक्का सकाळी साडे पाचच्या सुमारास बसला. तर 4.9 तीव्रतेचा दुसरा झटका सकाळी 8.4 मिनिटांनी बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-कश्मीरच्या सीमेला लागून असलेल्या चंबा गावात होता.