
महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, हिंगोली जिह्याला आज सकाळी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपचे धक्के बसले. धक्क्यांमुळे घरांची पडझड झाली. त्यामुळे झोपेत असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिह्यातील सर्वच गावांना आज सकाळी भूकंपचे मोठे धक्के बसले. पहिला धक्का सकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी बसला तर दुसरा धक्का त्यानंतर काही मिनिटांनी बसला. पहिला धक्का 4.50 रिश्टर स्केलचा तर दुसरा धक्का 6 वाजून 10 मिनिटांनी बसला. तो 3.6 रिश्टर स्केलचा होता.


























































