डहाणूत पुन्हा थरथराट… धुंदलवाडीत 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप

earthquake-measurement

डहाणू येथील भूकंपाचे भय संपता संपत नसून बुधवारी पहाटे सारे ग्रामस्थ साखरझोपेत असताना पुन्हा ‘थरथराट’ झाला. धुंदलवाडीजवळ 3.2 रिश्टर स्केलचा हा धक्का असून चार दिवसांत लागोपाठ नऊ वेळा धक्के बसले. एकीकडे कोरोनाशी दोन हात करीत असताना कोणत्या क्षणी भूकंप होईल या भीतीने डहाणू तालुक्यातील वाडय़ा-पाड्यांवरील बाया-बापड्यांची झोपच उडाली आहे.

धुंदलवाडी हा भूकंपाचा हॉटस्पॉट बनला आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास जुन्नरपाडा या गावात भूकंप झाला होता. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ग्रामस्थांची एकच पळापळ झाली. या धक्क्यातून सावरत नाही तोच पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचा दुसरा धक्का बसला. त्यानंतर अनेक जणांनी घराबाहेर धूम ठोकली. याच धुंदलवाडीमध्ये गेल्या वर्षी भूकंपाच्या धक्क्यामुळे एका छोट्या मुलीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत येथे सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या