व्हेनेझुएलामध्ये भूकंप, 164 ठार 971 जखमी, 11 हजार लोक बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करणाऱ्या व्हेनेझुएलाच्या नागरिकांवर काळाने झडप घातली. अवघ्या 39 सेकंदांमध्ये दोन शक्तिशाली भूकंपांमुळे व्हेनेझुएलामध्ये मृत्यूने थैमान घातले. शेकडो इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. या भूकंपात 164 जण ठार झाले असून 971 जण जखमी झाले आहे. 11 हजारांहून अधिक लोक बेपत्ता असल्याने मृत्युमुखीचा आकडा वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.

हिंदुस्थानी वेळेनुसार गुरुवारी पहाटे 3 वाजून 34 मिनिटे आणि 3 वाजून 35 मिनिटांनी 7.2 आणि 7.5 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरे दिले. भूकंपाचा केंद्रबिंदू व्हेनेझुएलाची राजधानी कराकसपासून 290 किमी अंतरावर होता. अवघ्या 60 सेकंदांत दोन हादरे बसले. याला ‘अर्थक्वेक डबलट’ म्हटले जाते. व्हेनेझुएलामध्ये गेल्या 126 वर्षांमध्ये आलेला हा सर्वात मोठा भूकंप आहे. यापूर्वी वर्ष 1900मध्ये 7.7 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने व्हेनेझुएला हादरला होता.