
जपानची राजधानी टोकयो शहराजवळील भागाला भूकंपाचे जबर धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 7.3 रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून त्यात 20 जण जखमी झाले आहे.
जपानमधील मियागी, फुकुशिमा या भागांना हे भूकंपाचे धक्के सर्वात जास्त जाणवले. .या भूकंपानंतर साडे नऊ लाख घरातील वीज खंडीत झाली आहे. टोकयो जवळील बरेचसे पावर प्लांट बंद पडल्याने ही सेवा पूर्ववत होण्यास बराच वेळ लागेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.




























































