
हिरवा वाटाणा भात, भाजी, ब्रेड अशा कोणत्याही पदार्थात घालून खाता येतो. अन्नाची चव वाढवणाऱ्या ओल्या हिरव्यागार वाटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात. हिवाळ्यात या वाटाण्याच्या हिरव्या, ताज्या शेंगा बाजारात सहज मिळतात. जुने आजार बरे करणाऱ्या मटारच्या दाण्यांचे आरोग्यदायी फायदे पाहूया.
वजन कमी होते
हिरव्या मटारच्या दाण्यांमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे मटार खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते. भूक लागत नाही. यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे जे लोकं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी आपल्या आहारात हिरव्या ओल्या मटारचा समावेश करा. वाटाणे उकडून त्याची भाजी किंवा सूप बनवता येऊ शकते.
प्रथिनांचा उत्तम स्त्रोत
प्रथिने आरोग्याकरिता आवश्यक असतात. अर्धा कप मटारमध्ये 4 ग्रॅम प्रथिने असतात. शिवाय आयर्न, फॉस्फरस, जीवनसत्त्व ए, के आणि सी हे घटकही असतात. प्रथिनांमुळे वजन कमी होते आणि स्नायूंची ताकद वाढते. या भाजीत जीवनसत्त्व सी असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते.
मधुमेहींकरिता गुणकारी
मधुमेह नियंत्रित करण्याकरिता मटार खाणे फायदेशीर ठरते. मटारच्या दाण्यांमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स खूपच कमी असते त्यामुळे मधुमेहींनी मटारची भाजी, सूप आहारात घ्यावे. यामधील जीवनसत्त्वांमुळे मधुमेहाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते.
पचनक्रिया सुरळीत होते
मटारमध्ये फाइटिक अॅसिड आणि लेक्टिन यासारखे एंटीन्यूट्रिएंट्स असतात. ज्यामुळे शरीरातील आयर्न, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारख्या मिनरल्सची क्षमता वाढते. लेक्टिनमुळे पोटात गॅस होणे, सूज येणे असे त्रास दूर होतात. यामध्ये असणारे फायबर बद्धकोष्ठतेच्या समस्येवर गुणकारी आहे.
ह्रदयाच्या आरोग्याकरिता फायदेशीर
हिरव्या वाटाण्यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे मिनरल्स ह्रदयाच्या आरोग्यासाठी गुणकारी आहेत. ह्रदयाचे बरेचसे आजार हे रक्तदाबाच्या समस्येमुळे होतात. हिरवे वाटाणे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यातील अँण्टीऑक्सिडंट ह्रदयाचे आरोग्य उत्तम ठेवते.






























































