कच्चा कांदा खाण्याचे अनेक फायदे; दररोज आहारात करा समावेश…

उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी कच्चा कांदा खातात. तसेच एखाद्याला चक्कर आल्यास त्याला शुद्धीवर आणण्यासाठी कच्चा कांदा नाकाजवळ धरतात. यावरूनच कांद्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याचे दिसून येते. मात्र, कांदा फक्त उन्हाळ्यातच नाही तर सर्व ऋतुंमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे त्याचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास त्याचे शरीराला फायदे होतात. मात्र, उग्र गंधामुळे कांद्याचा समावेश तामस पदार्थांमध्ये करण्यात येतो. त्यामुळे त्याचे अतिप्रमाणात सेवन टाळावे. कांद्याचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास अनेक रोगांपासून बचाव होतो.

कांद्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कांद्यामध्ये फॉस्फोरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि विटामीन सी हे घटक असतात. हे घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराला निरोगी ठेवण्याचे काम करतात. दुपारच्या जेवणात सलाद म्हणून कच्चा कांद्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच श्वासासंबंधीचे विकारही होत नाहीत. कांद्यात असलेले मॅग्नेशियम आणि खनिज घटक शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेली उर्जा मिळते.

कच्चा कांदा अॅण्टीबॅक्टेरियल म्हणून काम करतो. त्यामुळे शरीरात प्रवेश करणाऱ्या बॅक्टेरिया आणि व्हायरसवर कांद्यातील घटक हल्ला चढवतात. त्यामुळे शरीरात बॅक्टेरिया आणि व्हायरस तग धरू शकत नाहीत. तसेच कच्च्या कांद्याचे सेवन केल्यामुळे साथीच्या रोगांपासूनही संरक्षण होते. कांद्याचे सेवन केल्याने सर्दी खोकला यासारखे विकार होत नाहीत. उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कांदा रामबाण उपाय आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कांद्याचा वापर करण्यात येतो.

कांद्याचा समावेश दुपारच्या आहारात नियमितपणे केल्यास मधुमेह असलेल्यांना शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच कांद्याच्या सेवनाने कर्करोगापासूनही बचाव होतो. अनेक रोगांपासून बचाव करण्यासोबतच कांदा त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. कांद्यामुळे रक्ताभिरणाची क्रिया सुधारत असल्याने त्वचेला उजाळा मिळतो आणि केसांची मुळे घट्ट होण्यास मदत होते. त्यामुळे कांद्याचा आहारात नियमित सेवन केल्यास त्याचे फायदे दिसून येतात. मात्र, कांद्याचा दररोज आहारात समावेश करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आपली प्रतिक्रिया द्या