
अमेरीकेतील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बंदूकधारी हल्लेखोर लााईव्ह शो सुरु असताना आत शिरले आणि लोकांना गनपॉईण्टवर ठेवले. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेनंतर देशाच्या लष्कराला डिमोबिलाइझ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकरण दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरचे आहे. इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी मंगळवारी देशातील शक्तिशाली गुन्हेगारी गटांविरुद्ध लष्करी कारवाईचे आदेश दिले.
हुडी घालून आलेल्या बंदूकधारी हल्लेखोरांनी एका टिव्ही चॅनलवर हल्ला करत सुरक्षा कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मारण्याची धमकी दिली. ही घटना त्यावेळी घडली ज्यावेळी तुरुंगातून सर्वात मोठा माफिया पळाला. या खतरनाक माफिया तुरुंगातून फरार झाला आहे, या माफिया जेलमधून गायब झाल्याने देशभरातील तुरुगांमध्ये गोंधळ उडाला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात् असल्याचे लक्षात आल्यावर अमेरीका सरकारने इक्वाडोरमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. इक्वेडोरमध्ये मोठ्या संख्येने सुरक्षा दल विशेष मोहीम राबवत आहेत. ते अॅडॉल्फो मॅकियास उर्फ फिटो या ड्रग गँग लॉस चोनेरोसचा दोषी नेता पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मॅक्सिकन आणि कोलंबियन कार्टेलशी संबंधित प्रतिस्पर्धी टोळ्यांनी इक्वाडोरवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे, या स्पर्धेमुळे हिंसाचार उसळला आहे.
राष्ट्रपती नोबोआ यांनी सोशल मीडीयाव एक पोस्ट लिहीली आहे, त्यात लिहलीय की, सशस्त्र टोळ्यांचा बंदोबस्तसाठी लष्कराला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी अलमी पदार्थ्यांचा व्यापार करणाऱ्या टोळ्यांचीही नावेही त्यांना जाहीर केली. बंदुका आणि ग्रेनेडसह सशस्त्र हल्लेखोरांनी ग्वायाकिल बंदरातील टीसी टेलिव्हिजनच्या स्टुडिओवर हल्ला केल्यावर त्यांनी हे वक्तव्य केले.
























































