
कथित मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संजोयक अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांना शनिवारी राउज एव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला. याला 24 तास उलटत नाही तोच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स पाठवले आहे. ईडीने केजरीवाल यांना नववे समन्स धाडले असून 21 मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
Enforcement Directorate (ED) has issued the ninth summons to Delhi Chief Minister and Aam Aadmi Party (AAP) supremo Arvind Kejriwal in a money laundering probe related to irregularities in the Delhi Excise Policy 2021-22 case asking him to join the investigation on March 21.… pic.twitter.com/583sgBAbLo
— ANI (@ANI) March 17, 2024
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ईडी चौकशीला हजर राहत नाही, असे सांगत ईडीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे शनिवारी न्यायालयात हजर राहिले. यावेळी न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला.





























































