
दिल्लीतील दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी आपच्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. या नेत्यांपाठोपाठ संपूर्ण आम आदमी पक्षालाच आरोपी करण्याचा ईडीने प्रयत्न सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्यावेळी ईडीने आपण आप पक्षाला आरोपी म्हणून या प्रकरणात जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. अंमलवजाबवणी संचलनालय अर्थात ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी न्यायालयाला सांगितले की, आम्ही आम आदमी पक्षाला आरोपी बनविण्याचा आणि या घोटाळ्याशी पक्षाचा असलेला संबंध तपासण्याचा विचार करत आहोत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्यावेळी ईडीने आपले म्हणणे मांडले.
ईडीने मनीष सिसोदिया आणि आपचे संपर्क प्रमुख विजय नायर यांना या घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. राज्यसभा खासदार संजय सिंह यांनाही आपने याप्रकरणी अटक केली आहे. ईडीने जेव्हा आप पक्षाला आरोपी करणार असल्याचे म्हटले तेव्हा न्यायालयाने त्यांना प्रश्नव विचारला की आप पक्षाला एकाच गुन्ह्यात आरोपी बनवणार आहे की वेगळ्या गुन्ह्यात आरोपी बनवणार आहे. यावर ईडीने म्हटले की गुन्हा एकच आहे मात्र आरोप वेगळे असतील. ईडीच्या युक्तिवादावर आक्षेप नोंदवताना सिसोदिया यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले की, “ईडीने केलेल्या या विधानाचा परिणाम उद्या वर्तमानपत्रांमध्ये पाहायला मिळेले. या विधानाचा हाच उक उद्देश्य आहे. “
4ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी म्हटले होते की ईडीने केलेल्या तपासानुसार घोटाळ्यातून जमा झालेला पैसा पक्षाला गेला होता, हा पैसा सिसोदिया यांना मिळाला नव्हता. असे असेल तर मग पक्षाला आरोपी का करण्यात आले नाही. न्यायमूर्तींनी पुढे म्हटले की, तुमच्या म्हणण्यानुसार हा पैसा एका राजकीय पक्षाला गेला मात्र तो पक्ष अजूनही आरोपी नाहीये. याचं उत्तर तुम्ही कसं देणार की खरा लाभार्थी हा राजकीय पक्ष आहे.
























































