
प्रसिद्ध ऑनलाइन फॅशन रिटेलर मिंत्रा डिझाईमन्स प्रायव्हेट लिमिटेड ईडीच्या रडारवर आली आहे. ईडीच्या बंगळुरू झोनल ऑफिसने मिंत्राशी संबंधित कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट कायदा फेमाअंतर्गत सुमारे 1 हजार 654 कोटी रुपयांच्या घोटाळय़ाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मिंत्रा आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांवर फेमाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मिंत्राने होलसेल पॅश अॅण्ड पॅरी व्यवसायाच्या नावाखाली प्रत्यक्षात मल्टी ब्रँड रिटेड ट्रेडिंगचा व्यवसाय केला. मिंत्राने केवळ घाऊक व्यवसाय करत असल्याचे कागदोपत्री दाखवले. याच आधारावर 1 हजार 654 कोटी रुपयांहून अधिक परकीय गुंतवणूक हिंदुस्थानात आणली. मात्र, मिंत्राने त्यांची सर्व उत्पादने व्हेक्टर ई कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडला विकली.