
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मलेरियावर AdFalci Vax नावाची स्वदेशी लस तयार केली आहे. भुवनेश्वर इथल्या प्रादेशिक वैद्यकीय संशोधन पेंद्राने ही लस विकसित केलेय. ही लस मलेरियाचा प्रमुख स्त्राsत असलेल्या प्लास्मोडियम फाल्सीपेरमच्याचा संसर्ग रोखण्यात प्रभावी ठरू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
मलेरिया हा डासांमुळे होणार आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, हा आजार दरवर्षी सुमारे चार लाख लोकांचा बळी घेतो. दरवर्षीच्या आकडेवारीपैकी 50 टक्के मृत्यू नायजेरिया, काँगो, टान्झानिया, मोझाम्बिका, नायजर, बुर्किनो फासो या भागात होतात. हिंदुस्थानातही मलेरियाचे प्रमाण मोठे आहे. अलीकडच्या काळात मलेरियाने होणाऱया मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे. डब्ल्यूएचओच्या जागतिक मलेरिया अहवालात 2022 मध्ये हिंदुस्थानात मलेरिया आजारामुळे 5511 मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
मलेरियाच्या सामना करण्यासठी शास्त्रज्ञ गेल्या काही दशकांपासून लस विकसित करण्यासाठी काम करत आहेत. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. अलीकडेच आरटीएस, एस आणि आर21 या दोन्ही लसी वापरासाठी मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांचा प्रभाव 75 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे आयसीएमआरच्या AdFalci Vax लसीमुळे नवीन आशा निर्माण झाली आहे.
कशी काम करेल लस
प्रादेशिक मेडिकल रिसर्च सेंटरमधील लसीच्या विकासाचे प्रकल्प व्यवस्थापक सुभाष सिंग म्हणाले, ‘AdFalci Vax ही लस प्लाझ्मोडियम फाल्सीपेरमद्वारे उत्पादित केलेल्या दोन वेगवेगळ्या प्रथिनांच्या भागांचे मिश्रण असलेल्या प्रो 6 सी प्रथिनाचादेखील वापर करते. हे प्रथिन संसर्ग पसरवण्यापासून रोखते. प्रो 6 सी प्रथिन रोगजनकाच्या संक्रमणात व्यत्यय आणून रोगाचा पुढील प्रसार थांबवते.
आरटीएस, एस आणि आर21 या लसी फक्त सीएसपी प्रथिने वापरतात आणि फक्त लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये संसर्ग रोखू शकतात. आयसीएमआरची नवीन लस संसर्गापासून उत्तम संरक्षण देईल, असे संशोधकांना वाटते.