ल्युना आणि तिचे वंशज पक्के मुंबईकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरेमध्ये 2014 मध्ये अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा आम्ही सर्वत्र कॅमेरा ट्रप लावले. त्या वर्षी आम्हाला एक बिबट्याची लहान मादी आढळून आली. तिचे नाव ल्युना आहे. असे असे वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर म्हणाले.  मागील पाच वर्षे आम्ही ल्युनाचा अभ्यास करीत आहोत. या मादीने मागील पाच वर्षांत आरेमध्ये आठ पिल्लांना जन्म दिला. त्यांना व्यवस्थित वाढवले. आरे हे त्यांचे घर झाले आहे. आजच्या तारखेला आरेमध्ये आठ बिबटे आहेत. त्यातील बहुसंख्य बिबटे ल्युनाचे वंशज आहेत. तिने आतापर्यंत कोणावरही हल्ला केलेला नाही. ती गोरेगाव लिंक रोड क्रॉस करते.  पिले व ल्युना मुंबईकर झाले आहेत, असे नयन खानोलकर म्हणाले.

कारशेडच्या वाटेवर बिबट्यांची वाट

आरेमधील एक विजेचा टॉवर व त्याच्या मागे कार डेपोच्या नियोजित जागेचे छायाचित्र दाखवले. त्यात एक खडक दिसत होता. या खडकावर आलेल्या बिबट्याचे छायाचित्र दाखवले. या खडकापासून आरे कार डेपोचे स्थळ हे केवळ शंभर मीटर आहे. बिबटे त्यांच्या वाटेने ये–जा करतात. या वाटांच्या बाजूला आपण शहरीकरण केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आरेमधील जैवविविधता

मुंबईतील वन्य जीव अभ्यासक व वन्य जीव छायाचित्रकार नयन खानोलकर सादरीकरण करताना म्हणाले की, आम्ही  मागील पाच वर्षांपासून आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काम करीत आहोत. बिबट्यांवर व जगातल्या छोट्या  मांजरांवर अभ्यास सुरू आहे. आरेमध्ये हे दोन्ही आढळून येतात असे सांगत त्यांनी मेट्रो कार डेपोची नियोजित जागा  दाखवत त्याच्या परिसरात जैवविविधता कशी आहे त्याची छायाचित्रांसह माहिती दिली.