
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
अतिवृष्टी आणि दरड कोसळल्याने विस्कळीत झालेली मध्य रेल्वे आणि द.प.रेल्वेमार्गावरील म्हैसूर येथे दरडी कोसळल्याने कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या 8 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी एक्सप्रेस,करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, बंगळूर-कन्नूर-कारवार एक्सप्रेस,कारवार-कन्नूर-बंगळूर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी विकली स्पेशल, सावंतवाडी-लोकमान्य टिळक टर्मिनस विकली स्पेशल, पनवेल-सावंतवाडी विकली स्पेशल, सावंतवाडी-पनवेल विकली स्पेशल या गाड्यांचा समावेश आहे. 8 ऑगस्टची कारवार-बंगळूरू सिटी ही गाडी कारवार ते मंगलोर सेंट्रल दरम्यान रद्द करण्यात आली आहे. एर्नाकुलम-ओखा एक्सप्रेसची वेळ बदलण्यात आली असून सात ऑगस्टची ही गाडी उद्या दिनांक 8 ऑगस्टला सकाळी सात वाजता एर्नाकुलमवरून सुटेल.
Consequent upon heavy rainfall, water logging, landslide over Central Railway and Ghat section of Mysuru Division of South Western Railway on 04th August 2019 the following trains have been Cancelled / Partially Cancelled / Rescheduled. @RailMinIndia pic.twitter.com/xCitvH2oZu
— Konkan Railway Corp (@KonkanRailway) August 7, 2019






























































