
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई काँग्रेस कार्यकारी अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी घेत मिलिंद देवरा यांनी मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होत. तेव्हापासून हे पद रिक्त होते. आता काँग्रेसने एक पत्र जारी करून मुंबई काँग्रेस कार्यकारी अध्यक्षपदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.
INC COMMUNIQUE
Hon’ble Congress President has appointed Shri Eknath Gaikwad as the working President of Mumbai Regional Congress Committee. pic.twitter.com/j3EfDVt8L0
— INC Sandesh (@INCSandesh) July 26, 2019
मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतरही पक्षातील मतभेत समोर आले होते. संजय निरुपम यांनी देवरा यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले होते.

























































