
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर अकाऊंटवर आज सकाळी पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे पाहून सर्वांनाच धक्का बसला. अज्ञात अकाऊंटवरून झेंडय़ांचे ते फोटो पोस्ट केले गेले होते. अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात येताच शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर अवघ्या पाऊण तासात पोलिसांनी शिंदे यांच्या अकाऊंटवर नियंत्रण मिळवले. एकनाथ शिंदे यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर कोणतीही संवेदनशील माहिती शेअर केली गेली नव्हती असे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. अकाऊंट हॅक करणाऱयाचा सायबर पोलीस शोध घेत आहेत.