रॅली, रोड शोवरील निर्बंध निवडणूक आयोगाने हटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सध्या पार पडत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आता जोरदार प्रचाराचा धुरळा उडणार आहे. देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या रॅली आणि रोड शोवरील बंधने हटवली आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांना खुल्या मैदानात पूर्ण क्षमतेने जाहीर सभा घेता येणार असून रोड शोचे आयोजन करण्यासही मुभा मिळाली आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांसंबंधी नियमांत सूट देण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. त्यानुसार राजकीय पक्ष त्या-त्या क्षेत्रातील जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेऊन रोड शोचे आयोजन करू शकणार आहेत. देशात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत आयोगाने निवडणूक सभा व रोड शोवर बंधने घातली होती.