
महाराष्ट्र विकास आघाडीने शनिवारी विधानसभेत बहुमताचा विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी रविवारी, 1 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे आमदार नाना पटोले तर भाजपकडून ज्येष्ठ आमदार किसन कथोरे यांनी अर्ज सादर केले आहेत. मात्र महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केल्यानंतर नाना पटोले यांचा विजय सहज मानला जात आहे.
रविकारी सकाळी 11 वाजता अध्यक्षांची निवड होणार असून अध्यक्षांची निवड झाल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.



























































