
मुंबईकरांची आवडती डबलडेकर आता पुन्हा नव्या अत्याधुनिक अवतारात मुंबईत लवकरच दाखल होत आहे. ही डबल डेकर इलेक्ट्रीक असून संपूर्ण वातानुकूलित आहे. तसेच या बसेसला दोन दरवाजे असणार असून अशा 900 एसी इलेक्ट्रीक डबल डेकर बेस्टच्या ताफ्यात समाविष्ठ होणार आहेत.
मुंबईकरांनाआता लवकरच एसी डबल डेकर बसमधून प्रवास करायला मिळणार आहे. बेस्ट उपक्रमाने वाहतूकीचे डिजिटल सेवेत रूपांतर करण्यासाठी आपल्या ताफ्यात 70 टक्क्यांहून अधिक इलेक्ट्रीक म्हणजेच बॅटरीवर धावणार्या बसेसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहेत. सध्या बेस्टच्या ताफ्यात 45 डबल डेकर बस धावत आहेत. बेस्टच्या शान असलेल्या डबलडेकर डिझेल जास्त वापरीत असल्याने तसेच त्या जुन्या झाल्याने त्यांचे मेन्टेनन्स डोईजड झाल्याने हळूहळू मोडीत काढण्यात येत आहेत. त्यांच्या जागी नव्या इलेक्ट्रीक 900 डबल टप्प्या टप्प्याने समाविष्ठ होणार आहेत. त्यापैकी पहिल्या बसचे येत्या शुक्रवारी लोकार्पण होणार होते. परंतू हा सोहळा अचानक पुढे ढकल्यात आल्याचे म्हटले जात आहे. बेस्टच्या ताफ्यात डिसेंबरअखेरीपर्यंत 225, मार्च 2023 पर्यंत 225 आणि जून 2023 पर्यंत उर्वरित 450 बस येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.






























































