
पाकव्याप्त गिलगिट बाल्टिस्थानचे मुख्यमंत्री गुलबर खान व त्यांच्या 11 समर्थक आमदारांची इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वतंत्र गट स्थापन करून पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यापुढे यापैकी कोणीही पक्षाचे नाव किंवा ध्वज वापरल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. तुरुंगात असलेले पक्षाचे प्रमुख इमरान खान यांच्या सूचनेवरूनच ही कारवाई झाल्याचे बोलले जाते.