
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱया गुणवत्ता यादीनंतरही तब्बल 73 हजार 686 विद्यार्थ्यांना कोणत्याही कॉलेजमध्ये अकरावीत प्रवेश मिळालेला नाही. यातील सर्वाधिक विद्यार्थी हे कॉमर्स आणि सायन्स शाखेत प्रवेश घेण्यास उत्सुक आहेत. यापुढे या दोन्ही शाखांचा प्रवेश विद्यार्थ्यांसाठी कठीण ठरू शकतो. कारण मुंबई विभागात कॉमर्स आणि सायन्स शाखांच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. दुसऱया यादीत प्रवेश मिळावा यासाठी मुंबई विभागातून 1 लाख 33 हजार 723 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी 60 हजार 37 विद्यार्थ्यांनाच कॉलेज अलॉट झाले आहे. यातील 13 हजार 282 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 6 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
नामांकित कॉलेजचा दुसऱया गुणवत्ता यादीच्या कटऑफमध्ये फारसा फरक झालेला यंदा दिसला नाही. आर्टस आणि सायन्स शाखेचा कटऑफ किंचित खाली घसरला असला तरी कॉमर्स शाखेच्या कटऑफमध्ये फारशी घट झालेली नाही. केसी आणि पोदार कॉलेजचा कॉमर्सचा कटऑफ दुसऱया यादीत इतकाच (91.4 टक्के) आहे. सर्वसाधारण प्रवेशाची आता केवळ शेवटची यादी जाहीर होणे बाकी आहे. यादीनंतर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे. या यादीतही ईडब्ल्यूएस (आर्थिक मागास प्रवर्ग) गटातील उपलब्ध जागांसाठी जास्त अर्ज आलेले नाहीत. या प्रवर्गातील 14 हजार 207 जागांसाठी 114 विद्यार्थ्यांनी अर्ज केले त्यांपैकी 109 जणांना कॉलेज अलॉट झाले आहे.
असे आहेत
दुसऱया यादीतील प्रवेश
एकूण जागा 1,39,794
आलेले अर्ज 1,33,723
प्रवेश मिळाले 60,037
शाखानिहाय प्रवेश
शाखा एकूण जागा अर्ज आले प्रवेश मिळाले
आर्टस् 17,605 9891 5125
कॉमर्स 77,259 80,758 37,186
सायन्स 42,188 42,467 17,333
एमसीव्हीसी 2742 607 393
मुंबईतील कॉलेजांचा कटऑफ (टक्केवारी)
कॉलेज आर्टस् कॉमर्स सायन्स
एचआर – 93 –
केसी 87.4 91.4 89
जयहिंद 91 91.8 88.4
झेवियर्स 94 – 91
रूईया 92.4 – 93.2
पोदार – 92.8 –
रूपारेल 87.2 90.2 91
साठये 77.8 88.2 88.4
डहाणूकर – 90.2 –
भवन्स, अंधेरी 79.4 88.2 87.6
मिठीबाई 87 90.6 87.4
एनएम – 93.4 –
वझे-केळकर 90 91.6 93
मुलुंड कॉलेज – 92.2 –
फादर अॅग्नेल – 84.6 92.8
बांदोडकर – – 93.4
बिर्ला 69.4 90.4 94
सीएचएम 72 85 91.6
































































