‘आरएसएस’ सोडून बाकीच्या कार्यकर्त्यांना अटक करा-गोळ्या घाला, राहुल गांधीचं टीकास्र

63

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुणे पोलिसांनी मंगळवारी देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करून टॉपच्या पाच संशयित शहरी माओवाद्यांना अटक केल्याने देशात जबरदस्त वादळ उठले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीटकरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेत या कारवाईचा निषेध केला आहे.

‘देशात आता फक्त एकाच स्वयंसेवी संस्थेला जागा आहे आणि ती म्हणजे आरएसएस. बाकीच्या सर्व स्वयंसेवी संस्था बंद करा. सर्व कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबा आणि जे तक्रार करतील त्यांना गोळ्या घाला. वेलकम टू न्यू इंडिया #BhimaKoregaon’, असं ट्वीट करत राहुल गांधी यांनी पाच जणांच्या अटकेवर टीका केली आहे.

भीमा-कोरेगाव नक्षली कनेक्शन, पाच शहरी माओवाद्यांना अटक

दरम्यान, एल्गार परिषदेतील आयोजनामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग आणि आर्थिक मदत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी माओवाद्यांच्या थिंक टँकवरच हल्ला केला. मंगळवारी पुणे पोलिसांनी एकाच वेळी मुंबई, ठाणे, हैदराबाद, रांची, फरिदाबाद, दिल्लीत छापेमारी केली. पोलिसांनी यापूर्वीच पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत आणि पत्रव्यवहारांमध्ये तेलगू कवी वरवरा राव, अरुर परेरा, गौतम नवलखा, वर्णन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज यांची नावे समोर आल्याने ही कारवाई केल्याची माहिती मिळते. मात्र या कारवाईमुळे मार्क्सवादी पक्ष, काँग्रेस, दलित समाजाशी निगडीत पक्ष आणि संस्थांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या