नक्षल समर्थकांवरील कारवाई लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी! प्रकाश आंबेडकर

61

सामना ऑनलाईन, मुंबई

एल्गार परिषदेनंतर भीमा-कोरेगांव इथे भयंकर दंगल पेटली होती. या दंगलीप्रकरणी आणि त्याआधी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेशी निगडीत असल्याच्या आरोपाखाली मंगळवारी वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोलिसांनी नक्षलसमर्थकांच्या घरावर छापे मारले होते. मात्र ही कारवाई लोकांचे निव्वळ लक्ष विचलित करण्यासाठी केली असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

भीमा-कोरेगाव नक्षली कनेक्शन, पाच शहरी माओवाद्यांना अटक

वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि सचिन अणदुरे अन्य काही जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्यांचा सनातनशी संबंध असल्याचं सांगितलं जातं. सनातनच्या लोकांविरूद्ध सुरू झालेल्या कारवाईवरून लक्ष विचलित करण्यासाठीच मंगळवारी देशभरात छापासत्र आयोजित करण्यात आलं होतं असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

नक्षली कारवायांमध्ये सहभागी प्राध्यापक शोमा सेन अखेर निलंबित 

सनातनच्या कथित साधकांविरोधात कारवाई सुरू झाल्यानंतरच मी अनेकांना आता एल्गार परिषदेच्या मुद्दावरून छापे मारले जातील असं म्हटलं होतं असंही आंबेडकरांचं म्हणणं आहे.  सरकारच्या विरोधात लोकं बोलायला लागली असल्याने ही कारवाई केली जात असल्याचंही आंबेडकरांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या