एल्फिन्स्टनच्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे फुल मार्केटमध्ये मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एल्फिन्स्टन येथील माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे फुल मार्केटमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या एटीएम मशीनचे नुकतेच दिमाखात लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे मार्केटमधील व्यापारी आणि कामगारांसह दररोज मार्केटमध्ये येणाऱ्या शेकडो ग्राहकांना आता पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे.

मॉंसाहेब सौ. मीनाताई ठाकरे फुल बाजार व्यापारी मंडळ आणि स्वयम रोजगार संस्था संचलित, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पिण्याच्या शुद्ध पाण्याचे एटीएम मशीन बसविण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या विशाखा राऊत आणि विभागप्रमुख महेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाच्या या कार्यक्रमाला उपविभागप्रमुख यशवंत विचले, शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे, शाखा समन्वयक रविकांत पडयाची, शाखा संघटक रिमा पारकर आदी यावेळी उपस्थित होते.

मंडळाचे अध्यक्ष शिवराज मंडलिक, उपाध्यक्ष नितीन पवार, कार्याध्यक्ष प्रकाश बुचके, सचिव अजय कौसाले, खजिनदार मच्छिंद्र शेलार, पारनेर तालुका संपर्कप्रमुख दादाभाऊ येणारे तसेच संचालक बापू लोळे, तुषार भोसले, गणेश शेरकर, राजेंद्र पवार, अजय खाडे, प्रवीण पुंडे, रामदास भोसले, राजेंद्र बोचरे, मंडई निरीक्षक धर्मा राठोड आदींनी कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत घेतली. मंडळाचे प्रमुख सल्लागार मनोज पुंडेदेखील यावेळी उपस्थित होते.