Emiway Bantai Injured- बॉलिवूडच्या प्रसिद्ध रॅपरचा भीषण कार अपघात? व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडच्या कलाक्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हिप- हॉपच्या दुनियेतील प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाईचा अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एमीवे सध्या त्याच्या एका म्युझिक व्हिडीओच्या शुटींगसाठी दुबईमध्ये आहे. यावेळी व्हिडीओ शुटींगदरम्यान एका कारमध्ये स्टंट करताना एमीवेचा भीषण अपघात झाला आहे.  या अपघातामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताचा व्हिडीओ स्वत: एमीवेने शेअर केला आहे.

एमीवे बंटाई ‘दुबई कंपनी’ (Dubai Company) हा म्युझीकल व्हिडीओ शूट करण्यासाठी दुबईतील शारजाह येथे आहे. दरम्यान एमीवेने त्याच्या यूट्यूब चॅनलवर यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तो स्टंट व्हि़डीओ शूट करताना दिसत आहे. हा स्टंट करतानाचा त्यांच्या कारचा अपघात होतो. हा व्हिडीओ पाहून एमीवेचे चाहते चिंतेत पडले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Emiway Bantai (@emiwaybantai)

व्हिडीओमध्ये एमीवे चालत्या कारच्या खिडकीवर बसलेला दिसत आहे. यावेळी कार चालत स्टंटबाजी करत असताना कार अचानक जाग्यावर थांबली. यामुळे अचानक कारला ब्रेक लागल्यामुळे बेसावध असलेल्या एमीवे बंटाईचा तोल गेला आणि एमीवे कारच्या बाहेर फेकला गेला. त्यामुळे तो रस्त्यावर जोरात अपटला. मात्र हा अपघात म्हणजे जाणूनबुजून केलेला स्टंट होता की खरच झालेला अपघात होता यासंदर्भात अद्यापही माहिती दिलेली नाही.

“स्टंट करताना चूक झाली….”अशी कॅप्शन एमीवेने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना दिलेली आहे. एमीवेच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच त्याच्य़ा प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.