उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या २७ जुलै रोजी शिवसेनेच्या वतीने बुलढाणा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून या रोजगार मेळाव्यासाठी नोंदणीस उस्फूर्त प्रसाद मिळत आहे. आतापर्यंत २०३१ बेरोजगार यवुक युवतींनी नोंदणी केली आहे.

माजी आमदार विजयराज शिंदे यांनी हा भव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. उद्या २७ जुलै रोजी बुलढाणा शहरातील राजे गार्डन येथे सकाळी १० वाजेपासून हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रोजगार मेळाव्यासाठी मुंबई, पुणे व इतर संभाजीनगर, नागपूर यासह देशभरातील ४१ मोठमोठ्या कंपन्या येत आहे. या कंपन्यांचे अधिकारी बेरोजगारांच्या मुलाखती घेवून पात्र उमेदवारांना स्पॉटवरच नियुक्ती पत्र देणार आहे. इयत्ता पाचवी ते पदवीधर, आयटीआय व तत्सम पात्रता असणार्‍या उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन शिंदे यांनी केले असून बुलढाणा विधानसभा मतदारसंघात या मेळाव्यासाठी नोंदणी आठ दिवसापासून सुरु असून आज सकाळपर्यंत २०३१ बेरोजगारांनी नोंदणी केली आहे.