Amazon वर देत होता खोट्या रेटिंग्स, तीन महिन्यांत कमावले 19 लाख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक तरुण Amazon वर खोट्या रेटिंग्स देत होता. या कामातून त्याने तब्बल 19 लाख रुपये कमावले होते. ऑनलाईन शॉपिंग करताना अनेकजण त्या वस्तूचा रिव्ह्यू पाहतात. अनेक ग्राहक वस्तू घेतल्यानंतर त्या वस्तूबद्दल आपला अनुभव रिव्ह्युच्या माध्यमातून देतात. त्यामुळे इतर ग्राहकांना त्याचा फायदा होतो. पण इंग्लंडमधील जस्टिन या तरुणाने चायनीज कंपन्यांकडून पैसे घेऊन अनेक वस्तूंना 5 स्टार रेटिंग दिले आहे.

जस्टिन  Amazon वरून वस्तू ऑर्डर करायचा. आणि ती वस्तू मिळाल्यानंतर तो त्या वस्तूला 5 स्टार रेटिंग देऊन चांगले रिव्ह्यु द्यायचा. नंतर चायनीज कंपन्या या तरुणाला त्या वस्तूचे पैसे द्यायचे. मग जस्टिन याच वस्तू ebay वर विकायचा. इतकेच नाही तर चायनीज कंपन्या जस्टिनला अनेक बक्षीसही पाठवत होते. हा तरुण Amazon वर क्रमांक एकचा रिव्ह्युवर होता. जस्टिन दर 4 तासांनी एक वस्तू ऑर्डर करायचा आणि प्रत्येक वस्तूला 5 स्टार रेटिंग देत होता. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत 14 लाख रुपयांच्या वस्तूंना 5 स्टार रेटिंग दिले होते. तसेच या कालावधीत त्याने 19 लाख रुपये कमावले होते. पण आपण असे काही केलेच नाही असा दावा जस्टिनने केला आहे.