
ओएन मॉर्गनच्या इंग्लंड क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात 3-0 अशा फरकाने लोळवले आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका 3-0 अशा फरकाने खिशात घातली. या धडाकेबाज मालिका विजयासह इंग्लंडच्या क्रिकेट संघाने आयसीसीच्या टी-20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली. त्यांनी ऑस्ट्रेलियाला खाली आणले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची
दुसऱया स्थानावर घसरण झाली. हिंदुस्थानचा संघ तिसऱया स्थानावर विराजमान आहे.
आयसीसी टी-20 रँकिंग (अव्वल पाच अष्टपैलू)
मोहम्मद नाबी (अफगाणिस्तान, 294 रेटींग)
शाकीब उल हसन (बांगलादेश, 268 रेटींग)
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया, 220 रेटींग)
रिचर्ड बेरींगटन (स्कॉटलंड, 194 रेटींग)
सीन विल्यम्स (झिम्बाब्वे, 190 रेटींग)
आयसीसी टी-20 रँकिंग (अव्वल पाच फलंदाज)
डेव्हीड मलान (इंग्लंड, 915 रेटिंग)
बाबर आझम (पाकिस्तान, 871 रेटिंग)
अॅरोन फिंच (ऑस्ट्रेलिया, 835 रेटिंग)
लोकेश राहुल (हिंदुस्थान, 824 रेटिंग)
रॅसी वॅन डर डयुसेन (दक्षिण आफ्रिका, 744 रेटग)
आयसीसी टी-20 रँकिंग (अव्वल पाच गोलंदाज)
राशीद खान (अफगाणिस्तान, 736 रेटींग)
मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान, 730 रेटींग)
अॅश्टन अॅगर (ऑस्ट्रेलिया, 706 रेटींग)
आदिल रशीद (इंग्लंड, 700 रेटींग)
तबरेझ शम्सी (दक्षिण आप्रैका, 680 रेटींग)
आयसीसी टी-20 रँकिंग (अव्वल पाच संघ)
इंग्लंड – 275 रेटिंग
ऑस्ट्रेलिया – 275 रेटिंग
हिंदुस्थान – 266 रेटींग
पाकिस्तान – 262 रेटिंग
दक्षिण आफ्रिका – 252 रेटिंग
अव्वल पाचमध्ये फक्त राहुलच
आयसीसीच्या टी-20 रँकिंगमध्ये हिंदुस्थानचा संघ तिसऱया स्थानावर असला तरी अव्वल फलंदाज, गोलंदाज व अष्टपैलू रँकिंगवर नजर टाकता या यादीत टीम इंडियाच्या लोकेश राहुलचाच समावेश आहे. हिंदुस्थानचा हा फलंदाज चौथ्या स्थानावर आहे. अव्वल फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा डेव्हीड मलान, गोलंदाजांच्या यादीत अफगाणिस्तानचा राशीद खान आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नाबी पहिल्या स्थानावर आहे.

























































