
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बेधडक सिनेमातून आणखी एका कपूरचे पदार्पण झाले आहे. कपूर कुटुंबातील आणखी एक सुंदर आणि प्रतिभावान चेहरा लॉन्च करणार आहे.

बॉलीवूड अभिनेता संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर ‘बेधडक’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय.

‘बेधडक’ सिनेमातील शनाया कपूरचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात शनायाशिवाय आणखी दोन नवे चेहरे दिसणार आहेत. लक्ष्य ललवानी आणि गुरफतेह अशी त्यांची नावे आहेत.

‘बेधडक’ सिनेमात ती निमृतच्या भूमिकेत दिसणार आहे. शनायाच्या लुकची प्रचंड चर्चा होत असून आकर्षक लूकमध्ये शनायाचे भरपूर कौतुक होत आहे.

शनायाच्या पदार्पणाबाबत अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे. पदार्पणापूर्वीच शनाया सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.

शनायाचे इन्स्टावर 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. शनायाच्या पोस्ट शेअर होताच व्हायरल होतात. तिच्या फॅशन सेन्सबाबत ती प्रसिद्ध आहे. अतिशय गोड आणि दिसायला सुंदर असलेल्या शनायाच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली आहे.

आता शनाया मोठ्या पडद्यावर काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. शनायाचा ड्रेसिंग सेन्स अप्रतिम आहे. ती फॅशनिस्टा आहे. तिच्या चेहऱ्याचे फिचर्स रेखीव आहेत. शनायाच्या तिच्या टोन्ड बॉडीला फ्लॉंट करणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.

हिंदुस्थानी पेहराव असो किंवा वेस्टर्न, शनाया कपूर प्रत्येक फोटोमध्ये आकर्षक दिसते.

सुहाना खान आणि अनन्या पांडे या शनाया कपूरच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. तिघींचे एकत्र अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.

शनायाचा जन्म 3 नोव्हेंबर 1999 रोजी झाला. तिचा धाकटा भाऊ जहाँसोबत तिचा चांगला बॉण्ड आहे. शनायाने नेटफ्लिक्स शो The Fabulous Lives Of Bollywood Wives मधून स्क्रीनवर पदार्पण केले.



























































