
शिल्पा शिंदे आणि गुलकी जोशी यांच्यातील वाद संपण्याचे नाव घेत नाही. दोघांमध्ये दरदिवशी वार पलटवार होताना दिसत आहे. मॅडम सर या प्रसिद्ध शो शिल्पा शिंदेने सोडल्यानंतर तिने शोची नवी मुख्य अभिनेत्री गुलकी जोशी हिच्यावर निशाणा साधला आहे. शिल्पाने एका मुलाखतीत सांगितले होते की गुलकीला हा शो करण्यात स्वारस्य नसल्याचा आरोप केला होता तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली होती.
शिल्पा शिंदे आणि गुलकी जोशीचा वाद तेवढ्यावर थांबलेला नाही. शिल्पाने पुन्हा एकदा व्हिडीओ शेअर करत गुलकी आणि सहकलाकार सोनाली नाईक हिच्यावर निशाणा साधला आहे, ती व्हिडीओत म्हणतेय तीन वर्षे तुमचा शो इतका वाईट असता तर शिल्पा शिंदे तुमच्या शोमध्ये आली असती का? तुम्हाला आनंद वाटायला हवा की काहीतरी चांगली गोष्ट होतेय. नक्कीच, तुम्हाला फेम बद्दल काय माहित आहे, तुम्ही काय पाहिले आहे? तुमचं काम तर होतंय. तुम्ही जळत होता ते दिसत होते. तुम्ही सेटवर येत नव्हता तुमच्या डुप्लीकेटसोबत काम होत होते. खरे बोलल्यावर तुम्हाला त्रास झाला? नंतर पुन्हा ती बोलली की, तुमच्या महिन्याची फी ही माझ्या एका दिवसाची फी आहे आणि मी या शोमध्ये होती त्यामुळे शोचे रॅंकिंक चांगले होते. याबाबत दोन्ही अभिनेत्रींशी संपर्क साधला असता शिल्पा म्हणाली, एक दिवस मी शुटींगला जाऊ शकले नाही आणि मी शो सोडल्याच्या अफवा सुरु झाल्या. कोणी ही अफवा पसरवली माहित नाही.काम निभावून जात होते. मी खरे बोलले होते त्यात एवढी मिरची लागण्यासारखे काहीच नव्हते. एका वरिष्ठ कलाकाराला तुम्ही अशापद्धतीने बोलता, त्यामुळे नक्कीच तुमची अक्कल गुडघ्यात आहे. मला या शो मध्ये आणल्यानंतर शोची रेटिंग वाढली आणि त्यासाठीच मला या शोमध्ये आणले असेल.
सेटवरील वातावरणाबाबत बोलताना शिल्पा म्हणते, गुलकी ही एकमेव अशी आहे जिला शो च्या शुटींगमध्ये अजिबात रस नाही. पुढे शिल्पा म्हणते, हा जोक आहे. गुलकी जोशी कोण आहे आणि तिने तिच्या करिअरमध्ये असे काय केले आहे? ती माझ्यामुळे प्रसिद्ध आहे. माझे मानधन पाहता ती मला खरेदी करु शकत नाही. शिल्पा बोलते, तिने यातून शिकायला हवे, मी फक्त लीड रोल साकारते, मला लोकांना माझ्या फुटेज द्यायचे नाहीय.
तर गुलकी जोशीला याबाबत विचारले असता गुलकी म्हणते, शिल्पाने आमच्यासोबत एकत्र शुटींग करायला सुरुवात केली. आमच्यासोबत आठवडाभर तिने शूट केले आणि शेवटचा ट्रॅक आम्ही शूट करत होतो. मात्र शेवटच्या दिवशी तिला काय झाले माहित नाही. ती अचानक आमच्यावर रागावली. तिने एका मुलाखतीत शो संपला आहे आणि आम्ही छापायचे काम करतोय असे सांगितले. माझे काम करण्यात स्वारस्य नसल्याचा आरोप केला. मला कळले नाही तिला नेमके काय सांगायचे होते ते. त्यावेळी मी बोलले, जर मी काम करण्यास इच्छूक नसते तर हा शो एवढा चालला नसता आणि त्यामुळे प्रेक्षक हे उत्तम परिक्षक आहेत. आम्ही अजूनही विचार करतोय ती का अशाप्रकारच्या पोस्ट करुन त्रास देत आहेत.
गुलकी पुढे म्हणते, मला वाटत नाही काही पर्सनल अटॅक आहे. ती हे केवळ लाईमलाइटमध्ये राहण्यासाठी करतेय. ती सतत चर्चेत रहाण्यासाठी हे करतेय. तिच्या प्रतिक्रियांनी आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. ती काहीही बोलूदेत लोकांचे या शोवर प्रेम आहे, त्यामुळे अशाप्रकारच्या प्रतिक्रियांचा शोवर काही परिणाम होणार नाही. तिने माझे फॅन फॉलोईंग वाढवले आहे. थॅंक यू शिल्पा शिंदे असे गुलकी म्हणाली.