हेच बघायचं बाकी होतं ! ना टॉप ना ब्रा घालून उर्फीचं फोटोशूट, नेटकरी भडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांमुळे कायम चर्चेच असते. मात्र आता उर्फीने कहर केला आहे. ब्रा, टॉप न घालताच अंगावर फुलं चिपकवल्याने नेटकरी तिच्यावर प्रचंड संतापले आणि काहीतरी लाज बाळगण्याचा सल्लाही तिला दिला.

उर्फी जावेदचे नवे फोटो पाहून सगळ्यांनाच घाम फुटला आहे. उर्फी नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्हिडीओत तिने अंगावर रंगीबिरंगी फुलं चिपकवलेली दिसत आहेत. यामध्ये तिने ना टॉप घातला आहे ना ब्रा घातली आहे. या लूकमध्ये उर्फी न्यूड रंगाच्या शॉर्टसोबत कमरेच्या वरील भागात फक्त फुलं चिपकवलेली दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फीने तिच्या खास लुकसह ग्लॉसी मेकअप केला आहे. न्यूड ग्लॉसी लिपस्टिक आणि हायलाइटर लावून उर्फीने तिच्या मेकअप लुकला ग्लॅम टच दिला आहे. यावर तिने पोनीटेल बांधून आणि समोरचे केस बाजूला पार्टेड करून स्टायलिश लुक दिला आहे.

उर्फीच्या हे लूकचे काहींना प्रचंड आवडले. तिच्या या नव्या लूकला तासभरात हजारो लाईक्स मिळाले. काही युजर्सनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. तर काही युजर्स उर्फीवर भडकले आहेत. एकाने मुलगी वेडी झाली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसऱ्या युजरने उर्फीला बिचारी गरीब, माझे दोन-चार कपडे घे असे लिहीलेय, तर अन्य एका युजरने थोडी तरी लाज बाळग असे लिहीले आहे.