नोकरदारांना झटका,पीएफवरील व्याजदर घटला

728

नोकरदार वर्गाला एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (ईपीएफओ) झटका दिला आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2020 मध्ये पीएफ डिपॉझिटवरील व्याजदर कमी करण्यात आला आहे. 2019 मध्ये पीएफवरील व्याजदर 8.65% होता तो आता 8.5% करण्यात आला आहे.

‘ईपीएफओ’च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. यावर्षी व्याजदर आहे तेवढाच ठेवणे ईपीएफओसाठी मुश्कील होते. दीर्घ मुदतठेव, बाँड्स आणि सरकारी सुरक्षेतून होणाऱया नफ्यात गेल्या वर्षभरात घट झाल्याने व्याजदर कमी केल्याचे सांगण्यात येत आहे.

‘ईपीएफओ’कडील वार्षिक जमा रकमेवरील 85 टक्के भाग हा डेट मार्केटमध्ये तर 15 टक्के भाग एक्स्चेंज ट्रेडेड फंडमध्ये गुंतवला जातो. गेल्यावर्षी मार्च अखेरपर्यंत इक्विटीजमधील पीएफची एकूण गुंतवणूक 74 हजार 324 कोटी रुपये एवढी होती. यातून 14.74 टक्के रिटर्न मिळाला, मात्र पीएफवरील व्याजदर घटल्याने नोकरदारांचे नुकसान होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या