
जगातील सर्वात मोठी स्पेशालिटी पॅकेजिंग कंपनी असलेल्या ईपीएल लिमिटेडच्या प्लॅटिना पॅकेजिंग टय़ूबचा आता शंभर टक्के पुनर्वापर करता येणार आहे. त्याला अमेरिकेच्या असोसिएशन ऑफ प्लॅस्टिक रिसायक्लर्सकडून (एपीआर) जागतिक मान्यता मिळाली आहे.
ईपीएलची प्लॅटिना टय़ूब सर्वाधिक टिकाऊ आणि पुनर्वापर करण्योग्य नलिका आहे. इनर बॅरियर लाइनर असलेल्या या एकमेव टय़ूबचा एचडीपीईअंतर्गत पुनर्वापर करता येतो. या टय़ूबची उच्च गुणवत्ता असल्यानेच जागतिक स्तरावरील एपीआरकडून मान्यता मिळाली आहे. त्यासाठी ईपीएल प्लॅटिना टय़ूबला एनक निकष पूर्ण करावे लागल्याचे कंपनीचे एमडी सुधांशू वत्स यांनी स्पष्ट केले आहे.
प्लॅटिना ही एक इको फ्रेंडली लॅमिनेटेड टय़ूब असून तिची निर्मिती पाच टक्क्यांपेक्षा कमी अडथळा असलेल्या रेझिनने केली आहे. वापरानंतर या टय़ूब आणि झाकणांचे रिसायकलिंग करून दुधाची पॅन्स, ज्यूसच्या बाटल्यांची निर्मिती केली जाऊ शकते. प्लॅटिना टय़ूबचा संपूर्ण पुनर्वापर करणे शक्य असल्याने प्रदूषणालाही आळा बसणार आहे. आमच्या या उत्कृष्ट टय़ूबला एपीआरकडून मान्यता मिळाल्याने आमची कार्यक्षमता वाढेल असा विश्वास सुधांशू वत्स यांनी व्यक्त केला आहे.

































































