कोव्हिशिल्ड घेणारे चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युरोपात कोव्हिशिल्ड लसीला मंजुरी न मिळाल्याने अनेक प्रवाशांना लस घेतल्यानंतरही क्वारंटाइन राहावे लागत आहे. युरोपातील अनेक देशात याला मंजुरी मिळाली आहे. युरोपीयन मेडिसीन एजन्सीने (EMA) सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाकडून कोव्हिशिल्डच्या अधिकृततेसाठी अर्ज प्राप्त झाला नसल्याचे सांगितले आहे. ईएमएने पुढे म्हटले की, कोव्हिशिल्ड लसीसाठी सीरमने आतापर्यंत कोणताच अर्ज सादर केलेला नाही.