सर जे. जे. रुग्णालयाचे हर्निया सर्जरी तंत्र जगात सर्वोत्कृष्ट, युरोपियन काँग्रेसने केली ‘टॉप 3’मध्ये निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र भोगले  

मुंबई, दि. 4 – सर जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जे. जे. रुग्णालयाचा हर्निया शस्त्र्ाक्रियेचा व्हिडीओ जगामध्ये सर्वोत्कृष्ट ठरला आहे. अत्यंत गुंतागुंतीची हर्निया शस्त्र्ाक्रिया त्यांनी लॅप्रोस्कोपीद्वारे यशस्वीरीत्या केली. युरोपियन युनियन काँग्रेसने या व्हिडीओची निवड ‘टॉप 3’मध्ये केली आहे. हर्नियाच्या आव्हानात्मक शस्त्र्ाक्रियेचा व्हिडीओ अद्याप ऑनलाइन उपलब्ध नसल्याने जगभरातील भावी सर्जन्सना जे. जे. चा हा व्हिडीओ अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे.

जे. जे. रुग्णालयाच्या सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गिरीश बक्षी आणि टीमने मजुरीचे काम करणाऱया एका 21 वर्षांच्या तरुणावर ही आव्हानात्मक शस्त्र्ाक्रिया केली होती. त्याला डायप्रॅगमॅटिक हर्निया झाला होता. पोटातून छातीकडे जाणारा हा हर्निया असतो. त्यामुळे आतडय़ांना पिळ बसू शकतो आणि फुप्फुसावर दाब वाढून रुग्ण बेशुद्ध होण्याची शक्यता बळावते. लॅप्रोस्कोपिक पद्धतीने दुर्बिणीद्वारे जे. जे. रुग्णालयात या तरुणावर यशस्वी शस्त्र्ाक्रिया केली गेली.

या लॅप्रोस्कोपिक हर्निया शस्त्र्ाक्रियेचा व्हिडीओ युरोपातील एण्डोस्कोपिक सर्जन्सची संघटना असलेल्या युरोपियन युनियन काँग्रेसमध्ये सादर केला गेला. या काँग्रेसमध्ये जे. जे.च्या सर्जरी विभागाने एकूण 14 व्हिडीओ आणि ई-पोस्टर्स सादर केली. जे. जे. च्या सर्जरी विभागातील डॉ. अमोल वाघ, डॉ. अमरजीत तांदूर, डॉ. सुप्रिया भोंडवे, डॉ. शाल्मली धर्माधिकारी, डॉ. ऐश्वर्या दत्त, डॉ. बालमुरूगन गणेशन आणि डॉ. हर्षल पाडेकर या टीमने या काँग्रेसमध्ये उत्कृष्ट सादरीकरण केले.

 जे. जे. च्या सर्जरी विभागाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कामाचे सादरीकरण करून 2016 (सेजेस), 2017 (ह्यूस्टन), 2018 (सिएटल) असे सलग तीन वर्षे पुरस्कार मिळवून हॅटट्रिक केली होती. त्यानंतर सलग चौथ्या वर्षी 2019 मध्येही बाल्टिमोर येथील परिषदेत पुरस्कार मिळवला होता. 2020 आणि 2021 मध्ये कोरोनामुळे त्यांना कुठेही सादरीकरण करता आले नव्हते. पुढच्या वर्षी रोममध्ये होणाऱया ‘ईएईएस’ परिषदेचे आवताण जे. जे. ला मिळाले आहे.

जे. जे. रुग्णालयाच्या सर्जरी विभागाने युरोपमध्ये मिळवलेला हा प्रतिष्ठsचा सन्मान आहे. रुग्णालयाचे काम जगात नावाजले गेले याचा आम्हाला अभिमान आहे.

  •  डॉ. अजय भंडारवार, सर्जरी विभागप्रमुख, सर जे. जे. रुग्णालय