३१७ मशीन नादुरुस्त: बेंगलोर येथील बीईएल कंपनीकडे खराब मशीन्स दुरुस्तीसाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
printed-receipt-evm

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने नोव्हेंबर महिन्यात तपासणी केलेल्या ४ हजार ४०१ मतदान यंत्र मशीनपैकी तब्बल ३१७ मशीन नादुरुस्त असल्याचे आढळून आले आहेत. ही खराब मशीन्स बेंगलोर येथील बीईएल कंपनीकडे पाठविण्यात आली आहेत तसेच नव्याने वाटप करण्यात येणारी पीव्हीसी इपीआयसी (रंगीत मतदान कार्ड) ९५१९६ प्राप्त झाली असून ती तालुक्याच्या ठिकाणी वितरित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी प्रवीण खाडे यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅलेट यूनिट, कंट्रोल यूनिट व व्हीव्हीपीएटी या मतदान यंत्र मशीनची १३ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात फस्ट लेवल तपासणी करण्यात आली. यात तब्बल ४४०१ मतदान यंत्र मशीन तपासण्यात आली. यात तब्बल ३१७ मतदान यंत्र मशीन नादुरुस्त निघाली आहेत. यात २०३५ बॅलेट यूनिटपैकी २०, ११८३ कंट्रोल यूनिट पैकी १६३ तर ११८३ व्हीव्हीपीएटी पैकी १३५ मशीन ख़राब निघाली आहेत. ही सर्व ३१७ मशीन बेंगलोर येथील बीईएल कंपनीकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देतानाच २६ नोव्हेंबर पर्यंत ५ टक्के मशीनची मॉर्क पोल प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण खाडे यांनी दिली.

९५१९६ रंगीत मतदान कार्ड वितरित
निवडणूक विभागमार्गत नव्याने पीव्हीसी इपीआयसी (रंगीत कार्ड) मतदान कार्ड वितरित करण्यात येत आहेत. जिल्ह्यातही ही रंगीत कार्ड देण्यात येत असून जून २०१८ पासून आतापर्यन्त जिल्ह्यात ९५ हजार १९६ एवढी रंगीत कार्ड प्राप्त झाली असून ती वितरित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण खाडे यांनी दिली.