माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती स्थिर, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीत एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू त्यांची प्रकृती स्थिर आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करून हीए माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. सिंह यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थनाही डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे.


सोमवारी रात्री डॉ.मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळाले. त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले. सिंह यांचे वय 88 असून त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसही घेतली होती.

आपली प्रतिक्रिया द्या