दोन जिहादी बनले व्हाईट हाऊसचे सल्लागार, धार्मिक स्वतंत्रता आयोगाच्या सल्लागार बोर्डावर नियुक्त

गेल्या 30 वर्षांपासून अमेरिका आणि ब्रिटनसाठी पाकिस्तान दहशतवाद पोसत असल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊस प्रशासनाने दोन जिहादींना धार्मिक स्वतंत्रता आयोगाच्या सल्लागार बोर्डावर नियुक्त केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पत्रकार लॉरा लूमर यांनी ‘एक्स’वरून याबाबतचा दावा केला आहे.

इस्माईल रॉयर आणि शेख हमजा युसूफ अशी या दोन जिहादींची नावे असून रॉयर हा दहशतवादाशी संबंधित आरोपात 13 वर्षे तुरुंगात होता. अमेरिकेविरोधात युद्धाचा कट रचणे, 2003 साली अल कायदा-लश्कर ए तोयबा यांना मदत करणे यांसारखे आरोप त्याच्यावर आहेत. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार 2004 मध्ये रॉयरने शस्त्रs आणि स्पह्टकांचा गैरवापर करणे, दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांची कबुली दिली होती. याप्रकरणी त्याला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यातील 13 वर्षे त्याने तुरुंगवास भोगला.

…म्हणून रॉयर धार्मिक स्वतंत्रता सल्लागार समितीत

व्हाईट हाऊसने रॉयरला सल्लागार समितीत का समाविष्ट केले याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. रॉयरने पारंपरिक इस्लामी विद्वानांसोबत मिळून धार्मिक विषयावर सखोल अभ्यास केला. इस्लामी संघटनांमध्ये कुठल्याही प्रकारची आशा न बाळगता किंवा लाभ न घेता दहशकाहून अधिक काळ काम केले. 1992 मध्ये त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्याचे लेखन अनेक ठिकाणी प्रकाशित झाले आहे. त्यात इस्लामवर आधारित लेख ‘रिलीजियस वायलेंस टुडे फेथ अॅण्ड कॉन्फिक्ट इन मॉर्डन’चे लेखन केले होते, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

रॉयरनेच सांगितले तो जिहादी कसा बनला

2023 मध्ये मिडल ईस्ट फोरमसोबत झालेल्या चर्चेत रॉयरने त्याच्या प्रवासाबाबत सांगितले, तो जिहादी कसा बनला याबाबत स्पष्ट केले होते. मला लश्कर ए तोयबाचे लोक आवडत होते. मी बिन लादेनचा विरोधी होतो. अल कायदा एक विखुरलेला समूह होता. मी मस्जिदीत मुस्लिमांना लश्कर ए तोयबा संघटनेत सहभागी होण्यासाठी आणि कश्मीरमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करत होतो, असे रॉयरने म्हटले होते. दरम्यान, रॉयर एक पह्टोग्राफर आणि शिक्षकाचा मुलगा आहे. लहान वयातच तो कट्टरपंथीच्या दिशेने आकर्षित झाला. त्यामुळे त्याने 1992 मध्ये इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर इस्माईल असे नाव ठेवले. 2000 साली त्याचा लश्कर ए तोयबाशी संबंध आला.

शेख हमजाचा मुस्लिम ब्रदरहूडशी संबंध

शेख हमजा युसूफ पॅलिपहर्नियातील जैतुना महाविद्यालयात सहसंस्थापक म्हणून कार्यरत होता. त्याचा मुस्लिम ब्रदरहूडशी संबंध आहे. ‘9/11’ हल्ल्याच्या दोन दिवस आधी त्याने अल अमीनच्या इव्हेंटमध्ये भाषण केले होते. जमीन अल अमीनवर एका पोलीस अधिकाऱयाच्या हत्येचा खटला सुरू होता. युसूफने अमेरिकेवर वर्णभेदाचा आरोप केला होता. अमेरिकेतील ट्विन्स टॉवरवरील हल्ल्यात त्याची चौकशीही करण्यात आली होती. अशी दहशतवादी पार्श्वभूमी असूनही शेख हमजा युसूफला ट्रम्प प्रशासनाने व्हाईट हाऊस धार्मिक स्वतंत्रता सल्लागार समितीत घेतले आहे.