वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यभरातील हजारो जुन्या वाहनांनी अद्याप हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवलेली नाही. ग्रामीण भागात फिटमेंट केंद्र उघडण्यास विलंब झाला असून काही फिटमेंट केंद्रे बंद पडली आहेत. परिणामी, 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाने आता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

विविध कारणांमुळे ही प्रक्रिया रखडली आहे. राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार 30 नोव्हेंबरपूर्वी उच्च सुरक्षा नंबर प्लेट न बसवल्यास त्या वाहनांवर 1 डिसेंबरनंतर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे परिवहन विभागाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले.