देवगड आगारातून चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी जादा प्रवासी फेऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड आगारातून या वर्षी चाकरमानी व अन्य प्रवाशांना अधिकाधिक सेवा पुरविली जात असताना मे महिन्यात उन्हाळी हंगामात जादा प्रवासी फेऱ्यांची विशेष सुविधा देण्यात आली आहे. या वर्षीच्या उन्हाळी हंगामातील अंतिम टप्प्यातील गाड्या देवगड बोरिवली मार्गावर 11 व 12 जून या दोन दिवशी दुपारी 3 वाजता जादा प्रवासी फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

त्याचे आगाऊ आरक्षण उपलब्ध असून त्याचा फायदा प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिकांना प्रवास भांड्यात सवलत मिळथ आहे. त्यासाठी आवश्यक असणारी स्मार्ट कार्ड काढून घेण्यासाठी 30 जून अखेरपर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे. ही स्मार्ट कार्ड जेष्ठ नागरिकांना दर शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते साय 5 या वेळात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी जेष्ठ नागरिकांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर यांनी केले आहे.