
मणिपूरमध्ये बुधवारी आदिवासींच्या आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचे लोण आता राजधानी इंफाळसह इतर जिल्ह्यांमध्ये देखील पसरले आहेत. मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लष्कर आणि आसाम रायफल्सच्या 55 तुकडय़ा तैनात करण्यात आल्या असून दंगलखोरांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश मणिपूर सरकारतर्फे देण्यात आले आहेत. त्या आदेशाला राज्यपालांनीदेखील मंजुरी दिली आहे.
मणिपूर उच्च न्यायालयाने 19 एप्रिलला एका आदेशाद्वारे मैतेई समुदायाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याचे निर्देश दिले होते. त्याला राज्यातील नागा तसेच कुकी या समुदायांनी आक्षेप घेतला आहे. या निर्णयाविरोधात बुधवारी रात्री ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर यांनी बिष्णुपूर तसेच चुराचांदपूर जिह्यात मोर्चा काढला होता. मोर्चादरम्यान बिष्णुपूर जिह्यातील नागरिकांच्या गटाशी मोर्चेकऱयांची चकमक उडाली. त्यानंतर राज्यभर हिंसेचे लोण पसरले. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडय़ा पह्डूनदेखील हिंसाचार आटोक्यात आला नाही.
माझे राज्य धुमसतेय… मेरी कोमची मदतीची याचना
‘माझे राज्य मणिपूर जळत आहे’ असे ट्विट हिंदुस्थानची महिला बॉक्सर मेरी कोमने बुधवारी रात्री पावणेतीन वाजताच्या सुमारास करत मदतीची याचना केली आहे. या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग करत मणिपूरमध्ये जाळपोळ झाल्याचे फोटोही शेअर केले आहेत.



























































