उन्हाळ्यात त्वचा तजेलदारपणा राहण्यासाठी घरच्या घरी तयार करा हे फेस पॅक

193

1) पुदिन्याची पानं आणि चिमूटभर हळद एकत्र वाटून घ्या. त्या पेस्टमध्ये कोमट पाण्याचे काही थेंब टाका. हा पॅक चेहऱ्याला, हाताला लावा. दहा ते पंधरा मिनीटांनी धुवून टाका. चेहरा तजेलदार होईल. पुदिन्यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळेल.

2) साल काढून काकडी मिक्समधून वाटून घ्या. त्यात थोडी साखर टाका. ते मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. थोड्या वेळाने ते मिश्रण चेहऱ्याला लावला. यामुळे त्वचा कोरडी पडली असेल तर त्याला चकाकी येईल.

3) लिंबाचा रस, मध एक एक टेबलस्पून घ्या. अंड्याचा पांढरा भाग घ्या व त्यात लिंबाचा रस व मध टाका. व्यवस्थित मिक्स करा. ते चेहऱ्याला लावा. पंधरा ते वीस मिनिटांनी धुवून टाका. उन्हाळ्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर ते कमी व्हायला मदत होईल.

4) स्ट्रॉबेरी कुस्करून त्यात एक चमचा दही घाला. त्यात दोन तीन थेंब लिंबाचा रस व मध घाला. चेहऱ्याला लावून 15 मिनिटं ठेवा. यामुळे चेहरा तजेलदार होईल

5) केळे कुस्करून घ्या. त्यात एक चमचा मध, दीड चमचा मलई घाला व व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला लावा व 15 मिनिटांनी धुवून टाका

6) टोमॅटोचा गर एका वाटीत काढा. त्यात अर्धा चमचा मध टाका. ज्या ठिकाणी उन्हामुळे टॅनिंग झाले आहे. तिथे हा पॅक लावा. चेहऱ्यासोबत हाता पायालाही लावू शकता. थंड पाण्याने धुवून टाका. टॅनिंग कमी होईल.

आपली प्रतिक्रिया द्या