बेस्ट बसचे बनावट पास बनवून लोकांना स्वस्तात विकणारी टोळी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

बेस्ट बसचे बनावट पास बनवून ते नागरिकांना स्वस्तात विकणाऱ्या टोळीच्या चेंबूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या टोळीमध्ये वडाळा बस डेपोत पास बनवून देणाऱ्या ‘ट्रायमॅक्स’ कंपनीच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

म्हाडा कॉलनी ते कुर्ला बस डेपो या मार्गावर धावणाऱ्या 379 या बसमध्ये तिकीट व पास तपासत असताना बेस्ट बस निरीक्षकास पाशा शेख (23) या प्रवाशाने दाखवलेला पास संशयास्पद वाटला. या पासची संगणकावर तपासणी केली असता तो बनावट असल्याचे आढळले. त्याच्या चौकशीत अनिकेत जाधव, अर्जुन पटेल, अनुराग तिवारी, व तपशील पाटील ही टोळी बनावट पास बनवून नागरिकांना स्वस्तात विकत असल्याचे समोर आले. त्यापैकी अनिकेत हा वडाळा बस डेपोत ट्रायमॅक्स कंपनीत काम करीत आहे. त्याने गुह्याची कबुली दिली. अशी माहिती उपायुक्त उमाप यांनी दिली.