ठाणे : शिक्षण विभागाला बदनाम करण्यासाठी खोडसाळपणा

सामना  ऑनलाईन । ठाणे
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाला बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या दिल्या जात असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी केला आहे.
ठाण्यातील सावरकर नगर येथील महापालिकेच्या इंग्रजी शाळेतील ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे वर्ग डी-मार्ट या अशैक्षणिक कंपनीला देण्याचा डाव अशा आशयाच्या खोडसाळ बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. याबात आपण स्वत: शिक्षणाधिकाऱ्यांसोबत सदर ठिकाणी पाहणी केली असता, वृत्तपत्रातील बातम्यामध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले. डी-मार्ट संस्थेला कुठल्याही प्रकारे वर्ग खोल्या भाडेतत्त्वार देण्यात आलेल्या नाहीत. शाळेची पाहणी करत असताना उपस्थित पालकांना नवीन वर्ग खोल्या दाखवल्या असता त्यांचे देखील समाधान झाल्याचे सांगत असा खोडसाळपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा रेपाळे यांनी दिला आहे.