मिठाई खाल्ल्याने कोरोना बरा होत असल्याचा दावा, सरकारकडून दुकानाचे लायसन्स रद्द

741

मिठाई खाल्ल्याने कोरोना बरा होतो असा दावा एका मिठावाईवाल्याने केला होता. हा दावा त्याला चांगलाच महागात पडला असून सरकारने त्याचा परवानाच रद्द केला आहे.

तमिळनाडू मधील कोईंबतूर जिल्ह्यात एका मिठाईवाल्याने म्हैसुरपाक खाल्ल्याने कोरोना बरा होतो असा दावा केला होता. या म्हैसुर पाकमध्ये काही आयुर्वेदिक पदार्थ घातले आहेत, त्यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे मिठाई वाला सांगत होता. तसेच ज्याला कोरोनची लागण झाली नाही त्यांनीही ही मिठाई खाल्ल्यावर त्यांच्ची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्यांना कोरोनाचे एलागण होणार नाही असे मिठावाईल्याने म्हटले होते.

मिठाईवाला 50 ग्राम म्हैसुरपाक 50 रुपयाला विकत होता. या म्हैसूरपाकचे 4 पीस खाल्ल्याने कोरोना होत नाही असा दावा मिठाईवाल्याने केला होता. अखेर प्रशासनाने खोटी जाहिरात केल्याप्रकरणी या मिठाई वाल्याचा परवानाच रद्द केला आहे. तसेच एक लाख रुपये किंमतीची 120 किलो मिठाई जप्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या